Back to feed
I
Ishaan Singh Spiritual · Marathi · Spiritual

छानशी कवीता खास वारी निमित्त....* 🔻 🔴 *॥ मुक्काम ॥* 🔴 *पहिल्या मुक्कामी आळंदी सोडली* *पर्वतीची मिठी चरणा पडली ॥* *दुसऱ्या मुक्कामी शनिवार वाडा* *प्रदक्षिणा घाली पुण्यवान घोडा ॥* *तिसरी चढण सासवड घाट* *पुसू या मुक्तीची सोपानास वाट॥* *चवथा दिवस जेजूरी गडाला* *हळद लाऊया खंडोबा रायाला ॥* *पाचव्या दिवशी वाल्हा मुक्कामाला* *कथाकीर्तनात रात काढायला ॥* *सहाव्या दिवशी नीरा प्रवाहात* *पांडुरंगासवे रखुमाई न्हात ॥* *सातव्या दिसाचा जीवास आनंद* *पंढरीच झालं अवघं लोणंद ॥* *तरडगावाची आठवी पायरी* *माऊली थांबते दत्ताच्या मंदीरी ॥* *नऊ पावलात येई फलटण* *लीन झाला राजा घाली लोटांगण ॥* *दहाव्या वस्तीचे बिडणी बरड* *जीवा वेडावते नाथांचं भारुड ॥* *विसावा घ्यायचा नंदाच्या ओढ्याला* *चव अमृताची दह्याधपाट्यला॥* *अकराव्या रोजी नातेपुते गाठा* *गूळ द्या राहीला विठ्ठल जा हाटा ॥* *सदाशीव नामे बारावी नगरी* *घोड्याचे रिंगण विठ्ठल गजरी॥* *तेरावा मुक्काम माळशिरसचा* *शेजी अकलूज थांबा तुकयाचा ॥* *चवदावे दूर नाही वेळापूर* *गोंधळ भक्तीचा सूर्यास्तानंतर ॥* *तोंडले बोंडले पंधराव्या दिशी* *भंडी शेगावची होत जाय काशी॥* *सोळावी वाखरी पालख्यांचा मेळ* *भक्त खेळतात विठ्ठलाचा खेळ ॥* *पंढरपूरात येतसे माऊली* *विठ्ठल रुख्माई खेळती पावली ॥* *कोणती माऊली विठ्ठल कोणता* *सांगू शके ऐसा कोण गा जाणता ?॥* *विठोबा माऊली ज्ञानोबा माऊली* *नाम विर्घळता उरते "माऊली" ॥* 💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

82 likes 1 shares
WhatsApp