Back to feed
A
Anaya Bose Love · Marathi · Romantic

जे जे हवे होते मला मी तेच होते टाळले मी नेमके माझ्यातुनी तुजलाच होते गाळले झाली किती स्मरणे तुझी झाल्या किती जखमा नव्या नुसताच वारा लागला अन रक्त हे साकाळले मी शोधले पत्ते तुझे थकवून सारी अंतरे सांगे निखारा कालचा ज्याने नकाशे जाळले आले नव्याने बहर हे आला तसावारा पुन्हा मी पाहता वळुनी पुन्हा सारेच होते वाळले फसवून नियतीने दिल्या दु:खासवे मी रंगलो मी घाव सोसत राहिलो बाकी उगा किंचाळले

0 likes 0 shares
WhatsApp