Back to feed
M
Manav Malhotra Spiritual · Marathi · Spiritual

"जग मे रह जायेंगे प्यारे तेरे बोल" इक दिन बिक जायेगा माटी के मोल जग मे रह जायेंगे प्यारे तेरे बोल....या अवीट,सुरस,गोड आणि मधुर गीताचे बोल ओठांवर तरळून गेले की मग जगाची..जीवनाची नश्वरता समजते.जगण्यातली निरर्थकता लक्षात येते.आपण का जगतो?किंवा कशासाठी जगतो आहोत?हा कुसुमाग्रजांचा सवाल अंतर्मुख करतो.त्याबरोबर जीवनाचे फार महत्वाचे तत्वज्ञान जणू व्यक्त करतो. माणूस कुणाशी स्वतचे गुज सांगतो का? सांगताना त्याचे बोल कसे असतात.या साऱ्या प्रश्नांच्या उकल या गीताच्या शब्दात अधोरेखित केली जाते.प्राचार्य शिवाजीराव भोसले हे वैखरीचे स्वामी आणि मधुर शब्दगंगा ज्यांच्या मुखातून निरंतर वाहत राहिली असे एक शब्दांच्या रत्न्जडित देवालयांतील शब्दप्रभू आहेत.त्यांचे मत आहे की "आजची फुले उद्याचा पाचोळा असतो.आजचा देह उद्याची राख असतो " जर आजचा देह उद्या राख होणार असेल तर मग आपण सर्वांशी चांगले बोलायला हवे.शब्द पाण्यासारखे असतात त्यात साखर मिसळली की ते गोड लागते,मिठ मिसळले की खारट लागते, तिखट मिसळले की तिखट लागते.आणि हों मिसळण्याचे स्वातंत्र्य मात् केवळ र आपल्यालाच असते. गोड शब्दांचा लळा छोटया बाळा पासून म्हातारया माणसापर्यंत असतो. जीवनाच्या ओळीचा पूर्णविराम म्रुत्यूच असतो तर मग आपण नेहमीच गोड बोलण्याचा प्रयास करूया कारण गोड शब्द अमर असतात..काळालाही गोड शब्द पुसता येत नाहीत तर मग इथून पुढे जो शब्द मुखातून बाहेर पडेल तो गोडच असेल याची आपण दक्षता घेऊ यांसाठीच ही कोशिश...

121 likes 2 shares
WhatsApp