Back to feed
N
Nikhil Mishra Heartbreak · Marathi · Heartbreak

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही! एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही! जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे; सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही! कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो; पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही! सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी; एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही! स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे; एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही! वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत; सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही! संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा.... लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!

186 likes 62 shares
WhatsApp