Back to feed
K
Kabir Verma Love · Marathi · Romantic

जाणता अजाणता जुळले नातं जसं दवबिंदु अन् गवताचं पात सहवास क्षणभराचा एवढीच खंत पण तरीही विचार कोण करतं दवबिंदुच प्रेम पात्यापात्यावर ओघळतं कधी अश्रुं तर कधी मोती होउन बरसतं अलगदपणे येउन मातीत मिसळतं बघुन हे पात्याचं मन करपतं जीवापाड जपलेलं नाते असे तुटतं तेव्हा काय अन् कसे वाटतं आठवणींच्या वेदनांनी मन कस झुरतं हे ज्याने प्रेम केलंय त्यालाच कळतं विसरायचं म्हटले तरी कोण विसरतं नाही म्हटलं तरी पुन्हा पुन्हा आठवतं कारण प्रेमाच नातं हे असच असतं प्रेम तर नाही,आयुष्य माञ संपत...! 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

72 likes 79 shares
WhatsApp