जान्हवी : माझ्यात काय आवडतं? श्री : तुझं स्वतःचं असं काहीच नाही आवडत मला....पण "तुझ्या मनातला मी" आवडतो मला... जान्हवी : किती प्रेम करतोस माझ्यावर??? श्री : हे माझ्या हातातलं हिरवं पान दिसतंय ? त्या पानावर जितक्या हिरव्या शिरा आहेत न तितकंच प्रेम करतो. जास्त नाही... जान्हवी : मला कधी विसरशील? श्री : एकदम सहज विसरेन....हा आकाशातला सूर्य उगवायचा थांबला ना कि विसरेन... जान्हवी: कधी आठवशील मला? श्री : आठवण सारखी सारखी का काढू ? कधी तरीच काढेन... पापण्यांची उघडझाप करतील ना तेव्हाच काढेन... जान्हवी: तुझ्या सोबत राहिल्याने मला काही तोटा होईल का? श्री : तोटा तर आहेच...माझ्या सोबत राहिलीस तर तुला तुझं दु:ख कधीच एकटीला अनुभवता येणार नाही. त्यात अर्धा हिस्सा नेहमी तुला माझ्यासाठी काढून ठेवावा लागेल...
0 likes
0 shares