जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू . जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा,गहिवरला श्वास तू . पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू . सुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं, पुनवंचा चांद तू . जीव दंगला ... चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल,सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू . खुळं आभाळ ढगाळ, त्याला रूढीचा इटाळ, माझ्या लाख सजणा, ही काकणाचीतोड माळ तू . खूण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण, तुझ्या पायावं माखेल माझ्या जन्माचं गोंदण . जीव दंगला ... प्रेमवेडा
0 likes
0 shares