Back to feed
A
Anika Sharma Love · Marathi · Romantic

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू खुळं आभाळ ढगाळ, त्याला रुढींचा इटाळ माझ्या लाख सजणा ही कांकणाची तोड माळ तू खुणं काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण तुझ्या पायावर माखीन माझ्या जल्माचं गोंदण गीतकार : संजय कृष्णाजी पाटील, गायक : श्रेया घोषाल - हरिहरन, संगीतकार : अजय-अतुल, चित्रपट : जोगवा (२००९)

0 likes 0 shares
WhatsApp