जीवनाच्या प्रांगणात तू दिलेला काव्याचा प्रसाद त्याचा आनंद लुटण्यासाठी हे वागेश्वरी चिद्विलासिनी अष्टभूजा माते सरस्वती तू शब्द दे! भाव दे! विभाव दे! अनुभाव दे! स्फूर्ती दे! चैतन्य दे! या प्रसादरूपी शब्दात प्राण दे! अनन्यभावे शरण मी मंगलचरण वंदून प्रार्थिते मी! ज्ञानसाधनेसाठी अक्षरमालेच्या या लक्षकोटी ज्योती अखंड तेवत राहू दे!
0 likes
0 shares