******जीवापाड प्रेम करणारा****** होता एक प्रेम वेडा तिच्यावर खूप प्रेम करायचा. म्हणतात ना शोधणाऱ्या देव ही मिळतो. तसेच त्याने तिला शोधले होते. तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर त्याने तिला मिळवलं होतं. दोघेही एकमेंकावर जीवापाड प्रेम करायचे. तिचं जरा जास्तचं होत. पण काय करणार दोघांची ही भेट होणं शक्य नव्हते. कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला. फोन वर सवांद तसे दररोजचेच. पण भेट फक्त सहा महीन्याने होत असे. पण एक दिवस पूर्ण नूरच पलटतो. त्याला अचानक रक्ताच्या उलट्या होतात. त्याला डॉक्टर कडून समजत की त्याला कर्क रोग झाला आहे. आणि माझ्या हातात फक्त सहा महीने उरले आहेत. तो तिला त्याचा रोग समजू देत नाही. कारण सहा महीन्यांनी तिचा वाढदिवस असतो. आणि तिच्या वाढदिवशी त्याला तिला पहायचे असते. तिच्या वाढदिवसाला चार दिवस बाकी असतात आणि त्याला कळून चुकलेले असते की आपली वेळ जवळ आली आहे. तो मनात विचार करतो की तिच्या वाढदिवशी आपण तिला शेवटचं पहायचं आणि मगचं आपण आपले प्राण सोडायचे. सतत चार दिवस हा तिला त्याच ठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी ह्यांची पहीली भेट झाली होती. तिच्या कॉलेज मध्ये फंक्शन असल्या मुळे आपण वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी जाऊ असे त्याला सांगते... तो तिला शेवटचं विचारतो की तुला यायचं आहे की नाही. कसला ही विचार न करता ती त्याला नाही सांगते. वाढदिवसाचा दिवस उजाडतो. ह्याची वेळ जवळ आलेली असते ह्याच्याकडे फक्त तीन मिनिटे असतात. हा तिला फोन करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ती त्याला विचारते काय करतोयस. आणि हा शेवटी एवड्च म्हणायला जातो. तुझी वाट पा..... आणि जीव सोडतो त्याचे वाक्य पूर्ण झाले नव्हते. जेव्हा तिला कळत की तो आता या जगात नाही राहिला त्यादिवसा पासून ज्या ठिकाणी त्याने तिला भेटण्यासाठी बोलवलं असतं त्याच ठिकाणी ही प्रेमवेडी आपल्या वाढदिवशी फुल घेऊन त्याची वाट पाहत असते...फक्त ह्याच आशेने की तो कुणाच्या तरी रुपात येईल आणि तिला मिठीत घेईल...पण म्हणतात ना...डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो. पण माथ्या आड गेलेला जिवलग परत कधीच दिसत नाही.....
0 likes
0 shares