Back to feed
J
Jiya Rao Love · Marathi · Life

जवळीक !!........... तुझी माझी जवळीक सांगून जाते काही , तेंव्हा , अर्थशून्य जगणेही होते अर्थवाही !.................. खोल तिथें काळजात फुलारतो एक काटा , अन् कुणास ठाऊक पायाखाली का रेंगाळतात वाटा !.............. घुसमटलेल्या श्वासांना गंध येतो नवा , अन् पापणी आड अश्रुंचीही फुलें होतात तेंव्हा !............., आणि .... आणि वाटते गवसला माझ्या वेदनेला किनारा ! पण अरेरे !... एकाच लाटेसरशी तो ढासळे मनोरा !.................... तिथें , त्याखाली गाडला गेलोय मी तुझ्या पुढे नतमस्त ! अखेर एक प्रश्नचिन्ह निरुत्तर थडगस्त !!.................. पांडुपुत्र- ( प्रा.डॉ.प्रकाश पांडुरंग गोसावी

0 likes 0 shares
WhatsApp