Back to feed
K
Kunal Kapoor Love · Marathi · Life

जेव्हा कधी मित्राच्या, घरी जाण्याचा योग येतो, तेव्हा मनातल्या मनात, मी जरा घाबरून जातो, हा माझा मित्र, राहतो उंच टाँवरमध्ये पण मला तर वाटतं,तो राहतो, जणू एखाद्या किल्ल्यामध्ये, प्रवेशद्वारापाशी जेव्हा, मी माझी गाडी नेतो, वाँचमन त्या तिकडचा गाडी माझी थांबवतो, डिकी उघडण्यास मला, सांगतो तो खुणेने, तपासताना डिकी मजकडे, पाहतो तो संशयाने, कुणाकडे जायचयं? असे तो कडकपणेच विचारतो, मी आपला थोडासा दबूनच, नांव मित्राचे सांगतो, गाडी आत माझी सोडतो, तो थोड्या अनिच्छेनेच, आणि सांगतो,पार्क करा, गाडी गेस्ट पार्किंग मध्येच, पार्क करूनी गाडी, येतो मित्राच्या बिल्डींगपा़शी, त्या ठिकाणी होते भेट, माझी दुस-या वाँचमनशी, हा वाँचमन मात्र, अगदी कमालच करतो, मित्राला भेटण्याआधी, माझाच इंटरव्ह्यू घेतो, त्यानंतर तो रजिस्टर त्याचे, टाकतो माझ्या पुढ्यात, काँलम दाखवून म्हणतो, माहिती भरा यात, सीसी कँमेरा तिकडचा, रोखून बघत असतो, स्क्रिनमध्ये त्याच्या, मला मी, चोरासारखाच भासतो, फोन करून मित्राला, तो सांगतो माझे नांव, मिळताच परवानगी म्हणतो, "अभी अंदर जाव", लिफ्टमध्येही टिव्ही कँमे-याची नजर असते, सतत आपल्याला पाहते कुणी, ही जाणिव अस्वस्थ करते, एवढे सव्यापसव्य करून, एकदाचा मित्र भेटतो, पण आनंद या भेटीतला, कुठेतरी हरवून जातो, हल्ली भेटण्यासाठी, अपॉइंटमेंट घ्यावी लागते, सोबत कोण कोण आहे, याची कल्पना द्यावी लागते, ही सिक्युरिटी,हा वाँचमन, ही काळाची गरज झाली, आपल्या जगण्याची किल्ली, आपण त्यांच्या हाती देऊन टाकली, पुर्वीसारखे एखाद्याच्या घरी, अचानक टपकणे राहीले नाही, आणि पाहील्यावर आपल्याला, त्याचे आश्चर्याने दचकणे राहीले नाही, आता कोणाकडे, मुक्काम करणे शक्य नसते, घरात जागा असली, तरी मनात जागा नसते, घर मोठं झालं, पण वर्दळ कमी झाली, प्रायव्हसी, स्पेसच्या नावाखाली, माणसं एकाकी झाली, हजार स्क्वेअर फूट एरिया, माणसे चार फक्त, माणसांपेक्षा घरामध्ये, भिंतीच असतात जास्त, सुरक्षिततेच्या नावाखाली, असुरक्षित झालो आपण, प्रगतीची, ऐश्वर्याची ही, किंमत चुकवतो आपण. परिस्थिती ही आता, अपरिहार्य आहे, आजच्या जगात कदाचित, हेच व्यवहार्य आहे.

0 likes 0 shares
WhatsApp