Back to feed
A
Atharv Gupta Love · Marathi · Romantic

जेव्हा जेव्हा तुझीआठवण येते … जेव्हा जेव्हा तुझीआठवण येते …, मन चांदण्यातन्हावुन निघते … आशेच्या पावासाळी सरीने …, डोळ्यातले स्वप्न मग चिंब भिजते … माझ्या मनातल्या कोऱ्या कॅनव्हास वर…, तुझं चित्र मग आपोआपच उमटते … जेव्हा जेव्हा तुझीआठवण येते …, जणु श्रावणातली पहीली सर बरसते … तुझ्या आठवणींच्या सरीने …, कोमेजलेल्या या मनाच्या रोपाला …, मग नवी पालवी फ़ुटते … रात्रीच्या गर्द काळोखी आभाळातली …, शांत चांदणी जणु पुन्हा चमकते … माझी नजर मग …, त्या चांदण्यातही तुलाच शोधिते… कधी कधी तर वाटते की जाऊ दे …, तु नाही तर तुझी आठवण तरी येते … कमीत कमी माझं उदास मन थोडंतरी हसते… !!!

0 likes 0 shares
WhatsApp