*** ** जिव्हाळी ** *** हवा वाटला जिव्हाळा परि मिळाली जिव्हाळी नाही जराही ओलावा अशी लागली जिव्हारी ।।धृ।। अशी लागता जिव्हारी पापणीही पाणावली पहा तुडुंब नाहली मोती ओघळले गाली ।।१।। मोतियांची मुक्तमाला मुक्त नाहतच आली घालमेल हृदयाची अशी बाहेर निघाली ।।२।। अशी बाहेर निघाली माझ्या जिवाची जिव्हाळी नाही नखाला नखुली माझ्या मनाला लागली।।३।।
0 likes
0 shares