डोळे मिटता परी , तू समोर माझ्या येशील उघडता मी डोळे , तू गायबही होशील जादू असेल काही , तुझ्या येण्या जाण्या मध्ये पूर्णपणा असेल , माझं तुझं होण्यामध्ये तू , या माझ्या स्वप्नातली परी , कि अशीच कुणीतरी महाल तो सजला , सूर सनई घुमले मांडव तोरणे लावून , दार उंबरठे जमले माझ्या हृदईचा खेळ , तुला राणी करतो आहे तुझ्याविना हरदिनी , दरबार भरतो आहे तू , या माझ्या स्वप्नातली राणी कि ओळखीतलीच कुणी लग्नाच्या गाठी म्हणे , स्वर्गातच जुळतात अन याच गाठी पृथ्वीवर जुळवणारे agent , अगदी गल्लो गल्ली मिळतात पण असा कुठला agent , भेटला नाही मला जो माझ्यासाठी कोठूनतरी , शोधून देईल तुला तुला भेटला कोणी , तर हाक मार मला धावत येईन लगेच , हा शब्द तुला दिला मला तू हवी आहेस , मग ती राणी असो परी स्वप्नात येणारी असो , वा असो कोणीतरी.. 🌟🌟
0 likes
0 shares