V
Vanya Verma
Motivation · Marathi · Motivation
ढवळते माझेही भावविश्व उडतात गोंधळ, होतो कोलाहल उडून जातात जगण्याचे रंग त्या विटलेल्या रंगात कायम राहणारा पांढरा रंग हवास तू... १ थकते मी, धावून धावून शोधते रस्ता, अंधारतात दिशा पायातलं संपत जातं बळ त्या थकलेल्या पायांबरोबर त्याच गतीवर पावलं म्हणून हवास तू... २ गर्दीत जाते बिचकून मी, हरवून जाते वेगवेगळ्या चेह-यात माझीच मला अनोळखी होत त्या अपरिचित गर्दीत ओळखीची नजर घेऊन हवास तू... ३ डळमळतो स्वप्नांचा तोल, बोथट होतात आशेची किरणं ध्येयाच्या वाटात धुकं मिसळतं त्या धुसर परिस्थितीत फुंकून निखारा बनवणारा हवास तू... ४ विरविरीत होतात नात्यांचे पदर कधी आवळायला लागतात फास घर पेटवून लोक शेकत राहतात सुटत नाही, नि तुटतही नाही अशात विश्वासाचा श्वास हवास तू... ५
132 likes
45 shares