Back to feed
M
Meera Nair Love · Marathi · Life

तू अबोली बागेतली अबोल, एकदाच बोलून जातेस मी गुलमोहर नित्य मोहरणारा, खुपदा बोलून जातो तू आभाळातली चमकती वीज, एकदाच पडून जातेस मी ढग भरून येणारा पाऊस, खुपदा कोसळून जातो तू चैत्रातली कोवळी पालवी, एकदाच फुलून जातेस मी वैशाख वणवा रणरणता, खुपदा जाळून जातो तू संवेनांनी सजलेली वीणा, एकदाच झंकारून जातेस मी मृदुंगात लपलेला नादब्रम्ह, खुपदा वाजून जातो तू सदाफुली बहार बागेतली , एकदाच फुलून जातेस मी कालचा कोमेजला गुलाब , पाकळ्या गाळून जातो तू सुगंधी धुंद दरवळ मनातली, एकदाच भरून जातेस मी बेबंदी छंदीष्ट मुक्त मनातला, खुपदा सांडून जातो तू तालबद्ध नित्य सागरी लाट, एकदाच ओढून जातेस मी किनारा स्तब्ध निश्चल कधीचा, खुपदा भाळून जातो

0 likes 0 shares
WhatsApp