तू अशी ............!? वळवाची सर होशिल कां ? तू , तशी अचानक येशिल कां !!........ चैत्रपालवी , सृजन तराणा थुई थुईतो पानात उखाणा ! बिंब रेशमी होशिल का ? तू , तशी अचानक येशिल का !?.......... रंग लेवुनी वसंतातला कुणी फुलांवर जीव ओतला ! रंगबावरी होशिल का ? तू , तशी अचानक येशिल का !?............. सुरात वाहे गंधित वारा इंद्रधनुर्धर रिम झिम धारा ! ऊन केशरी होशिल का ? तू , तशी अचानक येशिल का !?............. चुकून यावा पक्षी दारी गिरकीतून छेडीत सतारी ! गीत सुगंधी होशिल का ? तू , तशी अचानक येशिल का !?.............. दोन जीवांच्या घडल्या भेटी जुळून आल्या रेशिमगाठी ! त्यास किनारा देशिल का ? तू , तशी अचानक येशिल का !?............. पांडुपुत्र- ( प्रा.डॉ.प्रकाश पांडुरंग गोसावी
0 likes
0 shares