ती आणी तो Cute love . ती : तू माझ्याशी भांडत नको जाऊ बरं 🙎 . तो : ते आपल्याला जमणार नाही... तेवढं सोडून बोल.. मी तर भांडणार... 😏 ती : किती नालायक आहेस... काय मिळतं तुला माझ्याशी भांडून ?? 😔 . तो : हो, नालायक तर आहेच... अगं ते गाणं नाही ऐकलयेस का...?? "कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है"... 😜 . ती : हो ऐकलय...🙆 . तो : पण तसं काहीही नाहीये .... 😄 . ती : ( वैतागून, त्याच्या खांद्यावर ४-५ चापटा मारत )... जा बाबा.. जा ... 😪 . तो : अरे हो हो... बरं ठीक आहे.. आता ऐक... . मी तुझ्याशी भांडतो... भांडतांना माझ्यावर जो हक्क दाखवतेस ना.. त्यासाठी... 😚 . मी तुझ्याशी भांडतो... तुझे, "मी आहे म्हणून सहन करतीये" हे शब्द पेलण्यासाठी... 😚 . मी तुझ्याशी भांडतो... "आजपासून बिलकुल बोलू नकोस माझ्याशी" हे वाक्य म्हणतांना तुझा बिथरलेला आवाज ऐकण्यासाठी... 😘 😘 . मी तुझ्याशी भांडतो... चेहऱ्यावर राग असतांना देखील एका अनामिक ओढीने माझ्याकडे बघणाऱ्या त्या डोळ्यांसाठी... 😘 😘 😘 . अन . मी तुझ्याशी भांडतो... भांडण संपल्यावर, तू मारलेल्या घट्ट मिठीत घालवता येणाऱ्या त्या अविस्मरणीय क्षणांसाठी.
0 likes
0 shares