तू आणि तुझं सर्व विश्व, अगदी माझं बनून गेलं होतं..!! ज्या क्षणी तुझ्यामध्ये, मी स्वतःला सामावून घेतलं होतं..!! ° तू आणि तुझा तो श्वास, अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता..!! ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला, मी माझ्या काळजात आसरा दिला होता..!! ° तू आणि तुझी स्वप्नं, अगदी माझ्या डोळ्यात जगत होती..!! ज्या क्षणी तुझ्या भावनांच्या विश्वात, मी माझं आयुष्य फुलवत होती ..!! ° तू आणि तुझा भास, माझ्या जगण्याची दिशा बनली होती..!! ज्या क्षणी तुझ्या प्रेमाला, मी अंतर्मनाने भुलली होती..!!
0 likes
0 shares