तू जेव्हा म्हणतेस , “तू नेहमीच असा वागतोस मुद्दाममला छळतोस ”, तेव्हा तू मला आवडतेस.. तू जेव्हा म्हणतेस, “मला तुझ्याशी बोलायचे नाही आता ..”आणि लगेच विचारतेस , “बोलतोस का आता ?”, तेव्हा तू मला आवडतेस.. तू जेव्हा म्हणतेस, “ परत जर असावागलास तर.. मी तुला कायमची सोडून जाईन... लक्षात ठेव ” , तेव्हा तू मला आवडतेस.. तू जेव्हा म्हणतेस , ”मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय .. आणि मला माहितीये की तुही माझ्याशिवाय.. ”आणि पटकन मला मिठी मारतेस, तेव्हा तू मला आवडतेस.
0 likes
0 shares