Back to feed
D
Dhruv Reddy Love · Marathi · Romantic

ती दिसली अन् मनात बसली ती होती भारी असली की ह्रुदयात कायम ठसली तिच्या नजरेत तीर करतात वार करती घायाळ पुरती झाली हार अशी ती नार स्वर्गातली अप्सरा जसली ओठ लालेलाल गोड गुलाबी गाल मृगासारखी मदमस्त तिची चाल बघणा-याचे झाले हाल जेव्हा ती गालात हसली नाजुक सुंदर कटी कंकनाचा चुडा हाती सोनेरी टीकली कपाला वरती औरच दिसे नार ती अन्य नसे कोणी असली

0 likes 0 shares
WhatsApp