तो प्राजक्त तिच्या उरिचा माझ्या मनी ग फुलतो मज वेड्या आबोलीच्या का? रोमरोमी दरवळतो ती सरिता का? आतुर होते सागरात विलीन होंण्या जरी तिचा पाठीराखा असतो सखा किनारा तो चन्द्रमा नभोमंडपि ताऱ्यांनाही झुलवि तरीही रातराणी का? सजते त्याचे चांदणे लेण्यासाठी प्रातःकाली येई रविकर अलिंगण्या अवनीला का ? तरीही व्याकुळ ती पर्जन्याच्या एका सरीला कसले हे नाते अनामिक काय म्हणावे याला मनांला मनाशी जोडणारा भावनांचा खेळ हा सारा
0 likes
0 shares