Back to feed
J
Jiya Sharma Love · Marathi · Romantic

तु माझ्याशी लग्न करशील....? एक अनोळखी मुलगा येईल, तुझं मन नाही तुझं रूप पाहिल , रूपावर भाळून लग्नाला होकार देईल... मान्य आहे तुझ्या भल्यासाठीच तुझे घरचे हा निर्णय घेतील पण.... एका अनोळखी मुलाशी लग्न करण्यापेक्षा, तु माझ्याशी लग्न करशील....? ∆∆ तुझ्या भावनांशी खेळले जाणार, कूणी चालायला तर कुणी बोलायला लावणार, आणि सगळ झाल्यावर तो, आई बाबांकडे हुंड्याची भीक मागणार... तुझ्या भल्यासाठी ते भीक देतीलही... पण...एका भिकाय्राशी लग्न करण्यापेक्षा, तु माझ्याशी लग्न करशील....? ∆∆ कदाचीत तो चांगला असेलही, पण तो तडजोड म्हणूनच होकार देईल, तुझे घरचेही त्याच रंग रूप, मुख्य म्हणजे पगार पाहून लग्नाला होकार देतीलही, पण...तडजोड करणाय्रा श्रीमंता पेक्षा, तु माझ्याशी लग्न करशील....? ∆∆ तो तुला बायको म्हणून घरात ठेवेन , मी तुला ह्रुदयात ठेवेन.. तो तुझ्या भावना समजण्याचा प्रयत्न करेल, मी तुझ्या भावनांशी नातं जोडेन... माझ्या शब्दांवर आज तु हसशील.. पण... खरच , एका अनोळखी मुलाशी लग्न करण्यापेक्षा, तु माझ्याशी लग्न करशील....?

0 likes 0 shares
WhatsApp