Back to feed
K
Kunal Kapoor Love · Marathi · Romantic

*तु माझ्यासाठी परत ये...!* • न करमत आहे तुला, न राहवत आहे मला, हवेतला गारवा बनुन तु परत ये...! • स्वप्नांत रोज यायचीस तु, दबक्या पावलांनी तशीच, पैंजणांचा आवाज करत तु परत ये..! • थरथरतंय अंग माझे, जागतो मी रात्र रात्र, निशा बनुन माझ्यासाठी तु परत ये...! • प्रेम तु ही करतेस, प्रेम मी ही करतो, मन प्रसन्न करण्यास, सुगंध बनुन माझ्यासाठी तु परत ये...! • डोळयांत पाणी तुझ्या, आणि भिजतो आहे मी, अधु-या माझ्या कवितांना, शब्द बनुन तु परत ये..! • डोळे आतुरले पाहण्यास तुला, मी रडतो आहे एकटयात, अश्रु पुसुन आधार दयावयास तु परत ये..! • माझ्या सोबत रात्र रात्र बोलणारी, प्रिये माझ्यासाठी परत ये...!

0 likes 0 shares
WhatsApp