तु येणाऱ्या वाटेकडे टक लावुन माझे पहात राहणे मिस करतोय क्लासमध्ये तुझ्याशी बोलण्याची धडपड करणे मिस करतोय मला हाय बोलुन तुझे माझ्या बाजुला येवुन बसणे मिस करतोय मी केलेल्या विनोदावर तुझे ते हसणे मिस करतोय तुला न समजलेल्या त्या विषयी तुझे मला विचारणे मिस करतोय ते तुला समजलेल्यावर तुला होणाऱ्या आंनदाला मिस करतोय क्लास संपला की तुझे मला बाय म्हणून जाणे मिस करतोय उद्या क्लासमध्ये काय होईल याचा विचार करणे मिस करतोय
0 likes
0 shares