Back to feed
S
Shaurya Gupta Love · Marathi · Romantic

तु येशील ना मी वाट पहातोय ते तळं नि तळ्याजवळचे हिरवंगार झाडं जिथं तू अनं मी खूप बोलायचो अगदी मनमोकळं तुझं ते निरागस हसणं नि हसताना गालावरची खुलणारी गुलाबी खळी वाऱ्यानं उडणाऱ्या केसांना सावरण्याची ती लगबग अन हवेत उडणाऱ्या गुलाबी ओढणीचा मोरपिसारा रूनझुनणाऱ्या पैंजणाचा नाद अनं कोकिळेच्या कुहू कुहूला तुझा गोड प्रतिसाद आठवतंय ग सगळं... आज ते तळंही आटलय अनं झाड ही सुकलंय.... मी आजही तुझी वाट पाहतोय त्याचं झाडाजवळच्या दगडाशेजारी जिथं तू बसायची... तुझ्या येण्याच्या वाटेवरील नजर हटत नाही पाने वाऱ्यानी सळसळतात जणू तू आल्याचा आभास करतात एकटक वाट पहात आहे तुझी तू येतो म्हणाली होतीस मी वाट पाहतोय नको उशीर करू येशील ना ग... I miss u Pilu...

0 likes 0 shares
WhatsApp