तू विरह दे मला... खरं सांगू तू दिलेला विरह, माझ्या अंतरआत्म्यावर गोंदवून गेलाय अडीच अक्षर "प्रेम"!! ऐकून होती की विरह खचवून टाकतो....रडून डोळे वाहून जातात...शरीराचा कोळसा होईल एवढा दाह आसतो म्हणे विरहात आणि बुद्धी विवेकशुन्य होते!! पण तू विरह दे मला ...कारण , तुझ्यातल्या प्रियकरत्वानं माझ्यातल्या प्रियसीत्वाला अजूनच पुष्ट केलंय तुझ्या विरहानं!! माझ्या अंतरंगात कुठलेच अविश्वासाचे तरंग तर उठत नाहीच. पण, माझ्या बुद्धीला अजूनच खोल खोल नेऊन, माझ्या चेहऱ्यावर बुद्धतेज तुझा विरहच जन्माला घालतो!! सतत तुझ्या चिंतनानं ,दाह मुळीच होत नाही. तर एक चंदनी झुळूक मला , देहीक आणि वैचारीक पातळीवर अजूनच अंतर्मूख आणि सुगंधी बनवतो तुझा विरह....आणि याच चिंतन मैथुनातून कित्येकदा मी अशा लालीत्य साहित्याची जननी होते!!! म्हणूनच तू विरह दे ❣️❤️❣️❤️❣️❤️❣️❤️❣️❤️❤️❣️❤️❣️❤️❣️❣️❣️
14 likes
84 shares