"तू सकाळी आंघोळ झाली की आधी काय करतोस...?" . . अचानक तिने मला प्रश्न केला... . . . मी उत्तर दिलं, "सगळ्यात आधी देवाजवळ दिवा लावतो".... . . त्यावर तिने विचारलं, "का...? . . "आपल्या घरात तर वीज आहे शिवाय दिवस ही आहे तरी देवाला वेगळा दिवा लावायची गरज का भासते...?".. . . माझ्याकडे ह्या प्रश्नाचं तसं बघायला गेले तर उत्तरच नव्हतं... . . तरी मी म्हणालो की देवापुढे उभं राहीलं, निरांंजन लावलं की मला मनःशांती मिळते"... . . त्यावर पुढे जे काही ती बोलली ते तुम्हा सर्वांबरोबर आवर्जून शेअर करावस वाटतं....... . . . . . . ती म्हणाली "कदाचित आत्ता मी जे सांगत आहे ते तुला काहीसं विसंगत वाटेल, पण समजून घे"... . . तुला सांगू का, प्रत्येक माणसाची जातकुळी वेगळी असते... . . आपण एखाद्याला बघितल्यावर किंवा त्याच्या वागण्यावरून काही विशेष ठोकताळे बांधतो...... . . काही माणसं काही क्षणातच मनाला भावतात तर काही कितीही सहवासात राहिली तरी ओढ नावाची गोष्ट निर्माणच होत नाही...... . . मन एक अजीब रसायन आहे... . . . फक्त सौंदर्य हे प्रेमात पडायला कधीच पुरेसं नसते... . . . खूप सुंदर असलेली व्यक्ति जर हट्टी, आत्मकेंद्रीत आणि अहंकारयुक्त असेल तर ती व्यक्तीदेखील कालांतराने कंटाळवाणी, निरस वाटू लागते, कितीही सुन्दर दिसत असली तरीही... . . कारण शेवटी आपण व्यक्तीच्या स्वभावाबरोबर रहातो... . . शरीर तर निमित्तमात्र आहे... . . त्याच व्यक्तीच्या स्वभावात गोडवा , विनयशीलता आणि शालीनता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते... . . . तू म्हणतोस देवापुढे निरांजन लावलं की मन शांत होतं... . . . घरात दिवे असूनही निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो... . . सहवासातील माणसांचं देखील तसेच असतं... . . एखाद्याच्या सौंदर्याने, प्रकाशाने दिपून जाणं, हा काही क्षणांचा खेळ असतो; पण खरे आत्मिक समाधान हे समईच्या इवल्याशा तेजानेच मिळतं... . . आयुष्यातही अनेक लोक येतात आणि जातात...... . . . काही जण तुम्हाला दिपवून टाकतात तर काही तुमच्या आयुष्यातील अंधाराची जाणीव करून देतात.......... . . . परंतु ह्या सगळ्यात खरं प्रेम समईच्या ज्योतीसारखं रहातं...... . . . शांतपणे तेवणारं आणि मनाला शांती देणारं....... . . . जगात कुठलीच गोष्ट शाश्वत , निरंतर नसते पण सात्विक प्रेम मात्र नेहमी सोबत रहातं, जगण्याची उमेद देत. . . नातं टिकतं ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासाचा आधार घेऊनच आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला व्यवहाराचे नियम लावायला सुरवात करता त्याचा पराभव निश्चित होतो... . . . अंधारल्या खोलीत लावलेलं निरांजन जसं दाही दिशा उजळतं, खरे प्रेमदेखील तुमची अशीच सोबत करतं..... . . . मनाला विश्वास देत जगाने नाकारलं तरी माझं प्रेम पाठीशी नेहमीच ठामपणे उभं राहील....... . . प्रेम म्हणजे भक्तिचेच एक रूप आहे. ज्याच्यात आर्तता आहे, पण याचना नाही.......... . . . आपल्या माणसांसाठी जळताना स्वतःच्या त्रासाची मोजदाद नाही........ . . . साधा विचार करून बघ, भोवताली दिव्यांची आरास असतानाही आपण समईच्या तेजापुढे नतमस्तक होतो ते का......... . . . कारण त्या तेजाला सात्विकतेचा, आपुलकीचा स्पर्श असतो... . . खरं सांगू? . . . असे, निरागस, पवित्र आणि भावनाशील प्रेम लाभणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी मिळकत असते, असं मला वाटतं... . . पण आजकाल असं प्रेम मिळणं ही गोष्ट अशक्य आहे, हे ही मी जाणते...... . . मी प्रेमाविषयी लिहिते म्हणून तुला सहज सांगितलं"... . . . त्यावर मी प्रसन्न हसलो...! . . . . कारण प्रेमाची एक वेगळी व्याख्या वेगळ्या शब्दात आज मी अनुभवत होतो...
0 likes
0 shares