तो सध्या काय करतो.....? नोकरी, पैसा आणि स्टेटसच्या पलीकडे ती त्याला प्रेमाने, सन्मानाने कधी पाहणार? याची वाट बघतोय... न बोलता, न सांगता लाथाडलं तेही त्याचं काहीही न ऐकता तो मात्र मुकाट्याने वेदना सहन करतोय तिला वेदना कधी समजणार? याची वाट बघतोय... सगळ्या मित्रांमध्ये छी थू हा त्याच्यावर होणारा अत्याचार कधी थांबणार? याची वाट बघतोय... घरच्या खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनांतून बाहेर पडून ती "माणूस" कधी होणार? याची वाट बघतोय... तोडून साऱ्या जाती-पातीच्या, पैशा-पाण्याच्या, स्टेटसच्या शृंखला त्याला त्याच्या हक्काचे जिवन मिळेल का? याची वाट बघतोय... फेसबुकचा पासवर्ड बदलून व्हाट्सअँप नंबर बदलून त्याला socially ब्लॉक करून ती हसते खिदळते सेल्फी काढते एकंदरीत एन्जॉय करते त्याला ते जमत नाही का जमत नाही? कारण तो वाट बघतोय... तिच्या मनात अजूनही प्रेम असेल का? त्याचं खरं प्रेम त्याला परत मिळेल का? तो फक्त आणि फक्त वाट बघतोय... सगळे म्हणतात "ती सध्या काय करते" पण "तो सध्या काय करतो" याचा कोणी विचार केव्हा करणार? याची तो वाट पाहतोय.....
0 likes
0 shares