Back to feed
S
Saanvi Deshmukh Love · Marathi · Romantic

ती सध्या काय करते ?... ती सध्या काय करतेय ?... ऱंग रूप आणि देहाच्या पलिकडे तो तीला सन्मानाने कधी पहाणार ? याची वाट बघतेय ... भर रस्त्यात तीची छेडछाड तीच्यावरचे बलात्कार कधी थांबणार ? याची वाट बघतेय ... ॲसीड फेकून तीच्यावर सूड न घेता तीचा नकार पचवायला कधी शिकणार ? याची वाट बघतेय ... मर्दानगीच्या खोट्या कल्पनांतून बाहेर पडून तो "माणूस" कधी होणार ? याची वाट बघतेय ... त्याची वाट बघतेय .....

0 likes 0 shares
WhatsApp