Back to feed
A
Ayaan Bhat Love · Marathi · Romantic

ती"अजूनही "त्याच्या" प्रेमात, परकी झाली असेल त्याच्या नयनात, कुणाच्या कर्तव्याचे ओझे घेऊन, त्याला एकट्याला अजून एकटं करून, जेंव्हा गाव सोडले तिने, हुंदके दिले होते जिने, त्या नव्या घरी ती आली, त्याची आठवण ती ल्याली, आता कुठल्या त्या कविता, कुठली गालांवर लाली? संसार सुरू हा झाला, पण दोर मिळेना त्याला, जोरात वाहता वारे, ती आठवे प्रीतिचे झरे, त्यानंतर चालू झाले, आयुष्यभराचे भाले, टोचती उगा दिनराती, त्याची नवीन नाती, कसा करू नात्याचा या स्वीकार? आता रोजच होतो बलात्कार... प्रेमाच्या त्या आठवांची, रोजचीच होळी चाले आसवांची!

0 likes 0 shares
WhatsApp