Back to feed
M
Myra Mehta Love · Marathi · Romantic

ती:-काय रे चूप का आहेस आज...? मी :- नाही ग कुठे काय...! ती :- मग कसला विचार करतोस एवढा...? मी :- काही नाही ग कसलाच नाही..! ती :- मी ऐकलंय छान छान कविता करतोस, मग आता पण काही मनात चालाय का...? मी :- तसं काही नाही गं,आता काही नाही आहे मनात आणि तुला कोणी सांगितलं मी कविता करतो ते..? ती :- तुझेच सर्वे मित्र बोलत असतात खूप छान कविता करतोस ते आणि मला सांग माझ्यावर कधी कविता केली आहेस का..? (मी एकदम गप्प आणि मनातच बोलतो...) मी :- माझ्या कवीता तुझ्या पासूनच सुरु होतात आणि तुझ्या पर्यंतच संपतात... ती :- काय रे गप्प का झालास, बोलत नाहीस,चल आज तू माझ्यावर एक कविता कर.मला सुद्धा ऐकायची आहे कशी कविता करतोस ते...? (मी मनातच बोलतो....) मी :- आज चांगली वेळ आहे.. सर्व सांगतो कवितेतून जे होईल ते होईल बघू पुढे... ती :- करतोस ना कविता, आता आजून किती वाट बघायची आहे... (ती मनातच बोलते..) निदान कवितेतून तरी सर्व सांगेल जे माझ्या मनात आहे, बघू काय बोलतो ते... मी :- {{{ तुझ्याच साठी...}}} मैत्री पासून आपलं नातं सुरु झालं... अनोळखी एकमेकांशी बोलू लागलो.. मैत्रीच नातं घट्ट झालं कधी, हे मला कळलच नाही... आपली मैत्री अशी होती कि, सर्व गोष्ठी एकमेकांशी वाटू लागलो... मैत्री तुझी मला खूप आवडते, पण हे मन कधी तुझ्या प्रेमात, रंगायला लागलं कळलंच नाही... जेव्हा पासून आयुष्यात आलीस, माझं सारं आयुष्यच बदलून गेलीस... आता तुझी सवय झाली मला, तुला भेटतो तेव्हा छान वाटतं मनाला... तुला एक दिवस नाही भेटलो, तर बैचेन होते जिवाला... तू समोर असलीस कि, तुलाच बघावसं वाटते... तू लांब गेलीस कि, नजर तुलाच शोधत असते... माझा दिवस, तुझ्या पासून सुरु होतो... आणि रात्र, तुझ्या आठवणीत संपते... आता माझं आयुष्य, तुझ्या आठवणीतच रमते... मनापसून प्रेम करतो तुझ्यावर, पूर्ण आयुष्य जगायचंय तुझ्याच बरोबर... तुला खूप खुश ठेवायचयं, तुझं आयुष्य आनंदाने फुलव

0 likes 0 shares
WhatsApp