Back to feed
R
Rohan Bhat Love · Marathi · Romantic

तिची आठवण आणि तुझी कविता...तिच्या आठवणींपासून असा का पळतोस दूर तूआहेत त्या तुझ्यासाठीच, वेड्या... ती तुझी अन तिचाच तू.... जेव्हा येईल परत भेटायला तिची आठवण तुझ्या दारी... घेउन तिला मिठीत तुझ्या सांग तुझी व्यथा सारी.... सांगेल मग ती ही तुला" कशी या दुःखात ही मजा आहे बघ कवीच्या नजरेने मला तू... तुझ्या आयुष्यभराची मी सोबतीण आहे.... "उचल ती लेखनी आताघे थोड़ी कागदे हाती... होऊ दे मना सैर भैरसोड तिच्या आठवांच्या गाठी...अड़खळतील शब्द... थरथरतील हातविरघळतील आसवे... या निळ्या रंगात...तिची आठवणच ं मग देईल तुझी साथ... धीर धर थोडासा, होईल शब्दांची बरसात.. तिची आठवण आणि तुझी कविता.... येतील मग गुंफूनी हातात हात.

0 likes 0 shares
WhatsApp