Back to feed
A
Ayaan Bhat Love · Marathi · Romantic

तिच नाव लिहून लिहून पुसायला विसरून जातो तिची जेव्हा आठवण काढतो विसरायला विसरून जातो... फार काही सांगायचं असत तिला जे हृदयात आहे पण जेव्हा पण भेटतो ऐकवायला विसरून जातो... भेटल्यावर अजून थोडा वेळ तिनं थांबावं असं वाटतं पण ती भेटली कि तिला थांबवायचं विसरून जातो..... आता तिच्या शिवाय दिवस सरता सरत नाही पण नेहमी स्वप्नात तिला हे सांगायच विसरून जातो... माझी प्रत्येक संध्याकाळ सांगते विसर तिला आता पण सकाळ झाली कि तिला विसरायचं हेच विसरून जातो ....

0 likes 0 shares
WhatsApp