Back to feed
A
Asha Agarwal Love · Marathi · Life

तिच्यासाथी झुरायचे तिच्यासाठी झुरायचे मन, पण सांगु नाही शकलो कधी.. ती असायची दिसायची आजुबाजुला, पण सांगु नाही शकलो कधी.. ती बोलता बोलता डोळ्यात पहायची वाचायची माझ्या मनातले भाव, पण लपवु नाही शकलो कधी.. कित्येकदा तिने खोल पाहिले असेल, पण नजर चोरु नाही शकलो कधी.. तिचा विश्वास होता माझ्यावर, माझे प्रेम असणार तिच्यावर.. हो, प्रेम होते माझे तिच्यावर, पण दाखवु नाही शकलो कधी... व्यक्त करता आले नाही कधी...

0 likes 0 shares
WhatsApp