Back to feed
S
Saanvi Deshmukh Love · Marathi · Romantic

तुजवीण नाही राहवत आता …!!! माझ्या मनातला विचार कसा सांगू मी तुला तूच का नाही येऊन विचारत मला … !! माझ्या मनात तू ,माझ्या ध्यानात तू चोहीकडे मला फक्त दिसते तू …!! तुझे हरिणीचे डोळे ,ते सश्यासारखे रूप माझ्या रसिक मनाला भावतात खूप…!! तुझ्यामुळे माझी उडाली आहे झोप आता मात्र माझी फक्त तूच आहेस होप …!! बास झाल आता खूप झाला वेळ चल माझ्या सोबतीला बसवूनी मेळ …!! माझ्या अपूर्ण मनाला पूर्ण कर आता नाही नको म्हणू ,तुजवीण नाही राहवत आता …!!!

0 likes 0 shares
WhatsApp