तुझे असण खुप काही देवून जात .......... तुझे नसणे खुप काही घेऊन जात .... तुझे हसणे माझ्या गालावर उमटत तुझे रुसणे काळजाला घर पाडत... तु आहेस म्हणून मला सुख साहते तु दूर असतांना शंकेच काहूर उठते तुझ्या दर्शनात मी जग पुरे विसरते सहवासात मी जगाला पुर्ण जिंकते तुला मनात ठेवून उरात प्रेमाने जपते भेटीत तुला सारे सांगायचे राहून जाते मुक्या भावनांना मग शब्दांत गुंफते कविता कल्पना विलासात पुर्ण मुरते जे मला बोलून न जमले ते मी मांडते तुझ्या हातात कागदाचा बोळा ठेवते झाडा मागे लपत मी तुझा चेहरा वाचते स्मित पाहून गाली माझ्या लालीमा प्रकटते
0 likes
0 shares