तुझी आठवणं आली की.. पापण्या मिटुन तुझा चेहरा बघतो, गेलेल्या त्या क्षणांमधला तुझा संवाद आठवुन बघतो.... तुझी आठवणं आली की.. त्या रोजच्या वाटेकडे बघतो, त्या वाटेवर उमटलेली तुझी पावले बघतो.... तुझी आठवणं आली की.. त्या पक्ष्यांकडे बघतो, त्यांच्या सारखे अजुनही माझे मन तुझ्याकडे धावताना बघतो.... तुझी आठवणं आली की.. त्या चांदण्यांना मोजत बसतो, रात्र-रात्र तुझ्याशी मारलेल्या त्या गप्पा आठवतं बसतो.... तुझी आठवणं आली की.. तुला हाक देऊन बघतो, तुझ्याचं अवतीभवती फिरणारं माझं अस्तित्व बघतो.... तुझी आठवणं आली की.... "मी" माझा नसतो, त्यावेळी "मी" फक्त तुझाचं होऊन बसतो....
0 likes
0 shares