तुझा ग लडिवाळ नखरा बेहोष मी जाहलो खरा खरा वाऱ्याचा तो लडिवाळ चाळा मलमली च्या त्या तुझ्या पदरा नाद हळुवार त्याच्या घुंगराचा लवली वाद्येही बहु आदरा लाजली ती सुंदर यवना झेलता माझ्या बेधुंद नजरा मुख झाकीले हाता मधुनी नाद सुरेल किणकिणणारा कंकणही लपेटून बसले स्पर्श असेल ना मोहवणारा लयीत पडले पाऊल पुढती नाद तिथेही रुणझूणणारा बसले खेटून पैंजण पायी दिमाख त्याचा मज जळणारा नादानेच त्या नाद लावला नादी लागलो पाहता ती सुंदरा
0 likes
0 shares