Back to feed
K
Kabir Bhat Love · Marathi · Romantic

तुझ्या अनोळखी गावी आलो तरी सगळंच परिचयाचं वाटत आहे ही माती तुझ्या पाऊलखुणा दाखवत आहे ही हवा तुझा स्पर्श घेऊन आल्याचं जाणवत आहे का कुणास ठाऊक, वाटत आहे मला... की या गुरांच्या गळ्यातल्या घुंगरांचा नाद कधी तुझ्याही कानी पडला असेल... ही राघूनं मैनेला घातलेली आर्त साद कधी तुलाही बेचैन करुन गेली असेल... या उंच उडणा-या पक्ष्यावर आज तुझीही नजर रोखलेली असेल... अनोळखी तुझं गाव तरी सगळंच परिचयाचं वाटत आहे! या हवेत तुझा गंध आहे मग कसं म्हणू तुझं गाव मला अनोळखी आहे !!

0 likes 0 shares
WhatsApp