Back to feed
A
Asha Kapoor Love · Marathi · Romantic

तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण , " ओढणी सांभाळ " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन ! तुला हसवणारे बरेच असतील पण , तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी एकटाच असेन ! . लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे बरेच असतील पण , " जपून चाल " सांगणारा कदाचित मी एकटाच असेन..! . हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण , तू रडताना, तुझा हात हातात घेवून धीर देणारा कदाचित मी एकटाच असेन ! . तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण , तुझ्या नकळत तुझी काळजी घेणारा मी एकटाच असेन......

0 likes 0 shares
WhatsApp