तुझ्या मनाच्या वस्तीत एक घर मला बांधू दे ... उन्हा थंडी पावसात थोडा आसरा मला शोधू दे. माहितीये मला तू बोलणारही नाही माझं अस्तित्व तुला जाणवणारही नाही एक फडफडणार पान मी तुझ्या झाडाचं बहरलं, सुकलं, चुरगाळलं तरीही तू निश्चल वटवृक्षासारखा थोडासा आधार दे तुझ्या अस्तित्वाचा मला अनुभवाचय तुझं अस्तित्व मला माझ्यात सावरायचंय मला स्वतःला तुझ्या अस्तित्वाने जगायचंय हे आयुष्य फक्त तुझ्याच आधाराने ..
0 likes
0 shares