Back to feed
V
Vihaan Kumar Love · Marathi · Romantic

तुझ्याजवळ खुप जवळ असावंसं वाटतंय . . . ओंजळीत तुझ्या अलगद येऊन मिटावंसं वाटतंय . . . केसांतुन तुझी हळुवार बोटं, लहरावंसं वाटतंय . . . माझ्या ओठांवर तुझे शब्द, गावंसं वाटतंय . . . क्षीण झालेला अश्रु बिचारा उगीच कण्हतोय . . . मनातला मऊ स्पर्श, माझ्यामधे रमतोय . . . माझा आळसही हलके हसुन तु झेलावा वाटतंय . . . क्षण जादु भरे सुगंधी व्हावे, सुगंधालाही वाटतंय . . . आपल्यामधलं निष्ठुर अंतर कमी व्हावं वाटतंय . . . चौकटीच्या परिघावरती तूच असावं वाटतंय..♥♥💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp