Back to feed
I
Ira Kumar Love · Marathi · Romantic

तुझ्यात मी माझ्यात तु स्वप्नात रोज फिरायचे कधीतरी कुठेतरी प्रीत फुल हे फुलायचे अशीच तु येत जा नदीवर रोजरोजदां अशीच तु गात जा फुलाफुलात हजारदां तुझ्यासवे नवे नवे प्रेमगीत गुणगुणायचे हळुच येवुन अंगणात फुल तु वेच वेचता हरवली न शहारली खुडलेला काटा काढता क्षणोक्षणी भास तुझे दिवस रात्र जागायचे हातात हात गुंफता जिवात जिव गुंतता हरवलो मी तुझ्यामधे तुलाच शोध शोधता असे कसे वेड तुझे आठवणीत मन झुरायचे

0 likes 0 shares
WhatsApp