Back to feed
R
Rudra Mishra Love · Marathi · Romantic

तुझ्यावर नव्याने येणारा संकटाना, परतीचा रस्ता मीच दाखवत होतो, तू केलेल्या प्रत्येक चुकीवर, माफ़ि मीच मागत होतो, तुझ्या चुकांनी होणार्या त्रासाने , वेळोवेळी मीच रडत होतो, तुझ्याकडून झालेली चुक तुला का कधीच दिसली नाही, माझ्या डोळ्यातून येणार्या अश्रुनाही किमंत राहिली नाही, कामाचा दबाव आहे म्हणून, तू मला टाळत होतीस, पण या कारणाखाली, तूच माझ्या पासून दुरावत होतीस, काम तेव्हा मीही करत होतो, पण माझ्या कामाचा दबाव मात्र तुला दाखवत नव्हतो, वाटत होते तुला माझ्या साथाची गरज आहे, मीच तुला समजुन घेणे हेच माझ्या नशिबात आहे, तुझे काम हे कधीच संपले नाही, आपल्यातील वाढत हे गेलेले अंतर, हे तर कधीच मिटले नाही, दरोज झोपताना देवाकडे एकच इच्छा असते, तू सदैव खुश रहावी हेच माझी मागणी असते,

0 likes 0 shares
WhatsApp