Back to feed
J
Jiya Kapoor Love · Marathi · Romantic

तुझ्याशी खूप बोलावे वाटते पण शब्द चुकण्याची भीती वाटते, तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते पण विरहाची भीती वाटते, तुझ्या खूप जवळ यावे वाटतेपण तोल सुटण्याची भीती वाटते, तुझा तो मन भुलविणारा चेहरा मला अस्वस्थ करतोपण त्याचे उत्तर देण्याची भीती वाटते, तुझ्या सहवासात मी नाही याची उणीव भासते पण तू माझ्या आयुष्यात आहे याची मला सतत जाणीव असते, तुझी स्तुती शब्दात करावी वाटते पण तुझ्यापुढे शब्द अपुरे पडतात, तुझ्यायाच गुणांवर मी प्रेम करतो पण तुला सांगण्याची भीती वाटते, तुझी माझी मैत्री अशीच सुगंधी राहो अशी मी जन्मो-जन्मी प्रार्थना करतो, तूच सांग मला हे प्रेम आहे कि मैत्री तुला काय वाटते..!!♡♡♡♡

0 likes 0 shares
WhatsApp