Back to feed
K
Kavya Kapoor Love · Marathi · Romantic

❤ ती,मी आणि पाऊस....... (लव्ह स्टोरी) (भाग १)....❤ "व्वाऽऽऽ....आलात या...! काय आणु तुमच्या स्वागतासाठी..पंचारती कि नाशिक ढोल...??. " बॉस जरा जास्तच चिडले होते राजवर.. राज ऑफिस मधला handsome hunk,smart .. दिसायला गोरा,हसताना गालावर मस्त खळी पडायची त्याच्या एका स्माईल ने मुली impress होयच्या पण त्याला मुलींपासुन कोणास ठाउक काय एर्लजी होती मुलींपासुन थोडा लांबच राहायचा...... "पण सरऽऽ ... पाऊस किती आहे आणि त्यात पुण्यातल्या traffic बद्दल काहि वेगळ सांगयला नको!!" राज... "अरे व्वाऽऽ कारण पण आहेत कि तुमच्याकडे.. तुम्हीच एकटे काय त्या बाइकवरुन प्रवास करता,आणि मी तर विमानाने आलो ना!!"... बॉस "सर next time पासुन अस काहि होनार नाहि" राज बॉस ला विनवु लागला... "ओके.. जर पुन्हा लेट झाले तर बाहेरुन च तुमचा राजीनामा देउन जा!!" बॉस..... "हा जा माहित आहे.... बायकोचा राग माझ्यावर काढतोय" राज मनातल्या मनातच पुटपुटला!!!..... "काहि म्हनालात??" बॉस "आऽऽ नाहि सर..काहि नाहि" राज... "ओके निघा आता,कामाला लागा" बॉस... राज बॉस च्या केबीन बाहेर जाणारच होता.. बाहेरुन रिना आत आली... .. रिना बॉसची सेक्रटरी फुल स्टायलीश गर्ल ऑफिस चा पूर्ण पुरुष स्टाफ तिच्या मागावर होता पण राज ला सोडुन ... "आली बॉसची चमचीऽऽ" राज मनातच पुटपुटला..."हाय राजऽऽ" रिना .. "ओऽऽ हाय.. गुड मोर्नीगं!!"राज "तुला गुड मोर्नीग बोलायची गरज नाहि वाटत आहे मला!!.. तुझी मोर्नीग चांगलीच गुड झालीय..हो ना!!"रिना ने बॉस कडे पाहत खोचकपणे राज ला विचारल .. "हम्मं"राज ला तिला काय बोलावे सुचत नव्हते.. "ओ आय म सो सॉरी सर आज जरा जास्तच उशीर झाला..यु नो ना पुण्याच traffic jam " रिना बॉसला उशीरा येण्याचे स्पष्टीकरण देत होती... "ओ इटस ओके रिना..मला माहित आहे " बॉसने हसतहसत उत्तर दिले.. "आईशपथऽऽ..कसला चालू आहे हा! मी पण हेच सांगितल तर माझ्यावर खेकचला..आणि हया बया ने सांगितल तर इटस ओके चलता है!घोर कलियुग मुलगी असण्याचा advantage ! बाकि कायययऽऽ" राज ला बॉसचा खुप राग आला होता.... "ओ मिस्टर राज अजुन तुम्ही इथेच जा!जा कामाला लागा डेडलाइन जवळ येतेय.. Project पूर्ण झाल पाहिजे" बॉस "ओके सर" राज निघाला.. तितक्यात रिना ने बॉस ला विचारले "सररर्ऽऽ मी काय काम करु." "तु आताच आली आहेस ना थोडा रेस्ट कर मग कामाला लाग" बॉस राज रिना आणि बॉसकडे पाहतच राहिला... "आय जस्ट हेट गर्लसऽऽ" राज रागारागात बाहेर आला.... राज त्याच्या डेस्क जवळ आला... आणि अनिल त्याच्या मोबाईल वर मस्त फुल वॉल्युम वर गाणे ऐकत होता... अनिल राज चा जिवाभावचा मित्र ऑफिस मधली जय आणि विरुची जोडी... " सावन का महीना, पवन करे सोर जियारा रे झूमें ऐसे, जैसे बनमां नाचे मोर.." "एएए.. बंद करना ते अन्या इथे कॅबीन मध्ये मस्त बॉस नाचलाय डोक्यावर आणि मोराला काय नाचवतोयस".. राज जरा जास्तच चिडून "ओ ..मिस्टर राज किती लवकर आलात आणि काय रे किती मस्त गाणे आहे बाहेर मस्त बारिश का मौसम हे गाण आणि गरमागरम चहा व्वाऽऽऽ ".. अनिल गाणे बंद करत मुद्दामच राज ची मस्करी करु लागला... "गप हा आधिच बॉस ने डोक खाल्लय तु जरा शांत रहा!" राज "अरे हो हो..किती चिडशील बस कर त्यात काय एवढं? " अनिल राजला शांत करत होता!! "अरे पण सर मला ओरडले हयाच काहिच वाटत नाहि मला..पण माझ्या नंतर रिना आली सर तिला काहिच बोलले नाहि.. आय मस्ट टेल यु! हया मुलीना खुप शाहण्या असतात.. स्वताःच्या अदाकारीने समोरच्याला कस बाटलीत उतरवायचं हे बरोबर माहित असते हया मुलींना.. आणि असा काहि चेहरा करतात जस किती साध्या आम्हि.. आणि त्यात जर एखादी सुंदर असली मग तर पुढे काहि बोलण्याची गरजच नाहि...दॅटस वाय..आय जस्ट हेट गर्लस..." राज अनिल ला स्पष्टीकरण देत होता... "ए गप्प हा..एवढया पण मुली वाईट नसतात.. तुझा आणि मुलींचा का छत्तीस चा आकडा आहे ते तुलाच माहित पण तु माझ्या सलोनीलाच बघ ना किती साधी आहे.." अनिल "हो का?? म्हणुच कधि काहि झालं तुझी चुक नसताना तुलाच सॉरी बोलाव लागत..ति चिडली तर मग बघायलाच नको तिला नोर्मल करायला तुला किती मागे मागे फिराव लागत.. खुप नखरे असतात रे मुलींचे म्हणुन नो गर्लस नो लव नो टेंशन, बी सिंगल ..." राज "तुला समजवण्यात काहि अर्थ नाहि..चल कामाला लाग...नाहितर बॉस येतील" अनिल दोघेहि आपआपल्या कामाला लागतात, काम संपवुन घरी जातात...!! पुढचा भाग पुढील भागात...

0 likes 0 shares
WhatsApp