तरुणपणी ..... तुझ्या गळा माझ्या गळा... गुंफू मोत्यांच्या माळा..... असं म्हणणारं जोडपं वृद्धावस्थेत काय म्हणतं बघा...... तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या गुंफू गोळ्यांच्या माळा कुठली गोळी किती वेळा लक्षात ठेऊ सार्या वेळा ।।धृ।। तुझी पिवळी माझी निळी गंमत आहे ही सगळी. लिहून ठेऊया गोळी नि गोळी नाहीतर होईल घोटाळा.।।१।। तुझी बीपीची अन डायबेटीसची माझी मोठी कॅप्सुल कॅल्शियमची तुझी जेवणा आधीची माझी नंतरची विसरून गेलो तर भोगा कळा ।।२।। बघुनिया सार्या गोळ्या हसतील सगळे खळाखळा येतील यांच्याही वेळा तेंव्हा रडतील तेही घळाघळा ।।३।। 😛😃😃
247 likes
45 shares