Back to feed
A
Arjun Reddy Love · Marathi · Romantic

तुला जा हवे तर, सखे मोड काडी हिवाळ्यात तुजला सतावेल खोडी किती पावसाळे, अहो सोसले ते वळीवात न्हाऊ, पुन्हा घेत गोडी वसंतास नाही तुझ्या मी विसरलो तुझी ऊब दे ना, नव्यानेच थोडी विसरलीस तू ती कशी पानगळती तुला अन् मला ही असे शालजोडी बिघडत्या कुशीला अशी मात देऊ अनामी ऋतू ते असो नागमोडी

0 likes 0 shares
WhatsApp